टॉप बातम्या

सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभाताई तातेड यांना पितृशोक

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०८ ऑगस्ट) : तालुक्यातील वनोजा देवी येथील प्रकाशचंदजी नेमीचंदजी भंडारी, यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई तातेड यांचे ते वडील आहेत. मनमिळाऊ स्वभावाने परिचित असलेले ७८ वर्षीय भंडारीजी हे आपल्या शेतामध्ये नेहमी प्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. तातडीने त्यांना वणी येथील रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी अंती प्रकाशचंदजी भंडारी यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगितले. वनोजा देवी मोक्षधाम येथे आज दुपारी प्रकाशचंदजी यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पाठीमागे पत्नी, ३ मुली आणि १ मुलगा व सुन असा आप्त परिवार आहे. 

Previous Post Next Post