सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (१४ ऑगस्ट) : नाव शेपाली! ती महाराष्ट्रातील नामवंत 'सहजं सुचलं'ची मुख्य संयाेजिका सुविधा बांबाेडे यांची ती कन्या. अभ्यासात निष्णांत असणारी शेपालीने इलेक्ट्रीक इंजिनियर पर्यंत शिक्षण केले. सध्या ती गुजरात येथे जॉब करतेय, तिचा एल अँड टी (L&T) मध्ये जॉब सुरु आहे.
परिस्थितीवर मात करीत तिने आपले शिक्षण पुर्ण केले. वेळ प्रसंगी शेपालीने (शिकत असतांना अल्पकालीन) खासगी जॉब देखिल स्विकारला, पण आलेल्या परिस्थितीत जिवनात ती कधी डगमगली नाही. महाविद्यालयीन जिवनात असतांना दाेनदा ती विद्यापीठ प्रतिनिधी राहिली आहे. आयुष्यात सर्वाधिक शिक्षणाला महत्व देणारी शेपाली ही नवाेदित तरुणींसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. तिचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे. वडिलांचे छायाछत्र हयात असतांना प्रेमाचा ओलावा न मिळणांऱ्या जन्मदात्या आईने मात्र, तिला भरभरुन प्रेम दिले. आपल्या उभ्या आयुष्यात ती आईच्या प्रेमाला कधीही विसरु शकणार नाही.
शिक्षणासाेबतच तिला नृत्य कलेची व गायनाची आवड आहे. आवाजही तितकाच सुरेख व सुंदर, बाेलणेही तितकेच मधुर व गाेड, महाविद्यालयीनच्या प्रत्येक परिक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारी शेफाली जरी गुजरातला राहत असली तरी तिला सणासुदीच्या दिवसात ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वगृही चंद्रपूरची आवर्जुन आठवण हाेते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना मिळत असलेल्या स्कॉलरशिप मध्ये पुस्तके खरेदी करुन शिक्षण पूर्ण करणारी शेपाली आज ही माेठ्यांचा मान सन्मान करते, नाेकरीत आल्यावर ही आपला बडेजाव पणा न दाखविणांऱ्या या शेपालीचे अनेकांनी मुक्तकंठाने काैतुक केले आहे.
- कविता चाफले
विशेष संकलन, चंद्रपूर
...अन् "ती" स्व बळावर उभी झाली !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
