सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (१४ ऑगस्ट) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थी वैभव रविंद्र मुसळे, या विद्यार्थ्यांने फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच शास्त्रशुद्ध फवारणी कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत प्रात्याक्ति कार्यक्रमात फवारणी करीता शेतकऱ्यांनी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गळ पाण्याचा वापर केल्यास औषधावर विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. तसेच शेतकऱ्यांनी मास्क, चष्मा, रबरी हातमोजे लाऊनच फवारणी करावी. फवारणी पंपाची टाकी ही लीक नसावी, फवारणी करता वेळेस तंबाखू, घुटखा व धुम्रपान करू नये, असे मार्गदर्शन केले व या सर्व पद्धतीचे प्रत्याक्षिक करून दाखविले.
या वेळी झरी तालुक्याच्या शेकापूर गावामधे झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी शेतकरी बंडू आसूटकर, बंडू वांढरे, रवी ठावरी, चंपत मडावी आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. दत्ता जाधव, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. स्नेहल आत्राम तसेच इतर शिक्षकांचे या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन लाभले.
कृषीदूताने केले युवा पिढीला शास्त्रशुद्ध फवारणीबाबतचे मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
