यवतमाळ : अरुणावती प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा

  

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
यवतमाळ, (१४ ऑगस्ट) : यवतमाळ जिल्ह्यातील  मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणारा अरुणावती प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या भरोशावर होणाऱ्या हजारो हेक्टर सिंचनाचा मार्ग शेतकऱ्यांसाठी मोकळा झाला आहे.

अरूणावती प्रकल्पाची जलाशय पातळी १७० दलघमी असून, आज रोजी प्रकल्पात १२७.२७ दलघमी म्हणजेच ७४.९० टक्के पाणी असून यामुळे रब्बी पिकांकरिता शेतकऱ्यांना गहू हरभरा व इतर पिकांना पाणी मिळणार असल्यामुळे सिंचनाचा मार्ग मोकळा झाला.

अरूणावती प्रकल्पाचे उजव्या मुख्य कालवा वरून आर्णी तालुका तर डाव्या मुख्य कालवा वरून घाटंजी तालुक्यात पर्यंत पाणी पोहोचते, यावर्षी प्रकल्पात ऑगस्ट महिन्यातच ७५ टक्के जलसाठा झाल्यामुळे उर्वरित पावसाळ्यात १०० टक्के प्रकल्प भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ : अरुणावती प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा यवतमाळ : अरुणावती प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा Reviewed by सह्याद्री चौफेर on August 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.