सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (१७ ऑगस्ट) : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, या क्षेत्राचा कायापालट झाला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिस्कुटी गावाचा चेहरामोहरा बदलविला जाईल.
हे सर्वांग सुंदर, स्वच्छ दिसावे, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात विविध विकासकामांचे भूमीपुजन संध्या गुरनुले यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपस्थित गट विकास अधिकारी मयूर कळसे पंचायत समिती मुल, उप विभागीय अभियंता गोंगले मूल, ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता बोरलावार, नितीन गुरनुले सरपंच ग्राम पंचायत फिस्कुटी, बंडूजी नर्मलवार सरपंच ग्राम पंचायत उश्राला, सरपंच संजय येनूरकर ग्राम पंचायत गडीसुरला, प्रशांत बाम्बोडे भारतीय जनता पार्टी चे प्रमुख कार्यकर्ता, उपसरपंच राकेश गिरडकर ग्राम पंचायत फिस्कुटी, चंदू नांमपल्लीवर राजोली, राजू पोटे, दांडेकर ग्रामसेवक फीस्कुटी, सतीश कावळे सदस्य, पोलिस पाटील पुरुषोत्तम वाढई, सुधीर मोहूर्ले, नितीन कदाम, ग्राम पंचायत सदस्य सतिश कावळे, सौ. पपीता मांदाळे, सौ.प्रेमीला शेंडे, सौ.रेखा चौधरी, सौ. भावना मोहुर्ले, नवनाथ गुरनुले, आदींची यावेळी उपस्थिती होती.
या प्रसंगी भोई समाजासाठी सभागृहाचे बांधकामाचे भूमीपुजन भूमीगत गटारे बांधकाम, गुजरी चौकात चावडी बांधकाम, विहिरीवर इलेक्ट्रीक मोटारपंप, पाण्याची टाकी, नळ योजना पुरविणे, सोलर वॉटर हिटर, सोलर सिस्टिम आदींसह अन्य ३ कोटींच्या विकासकामांचे भूमीपुजन पार पडले. ही कामे आमदार निधी, जिल्हा निधी, जनसुविधा व अन्य योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे त्वरीत पूर्ण होऊन ग्रामस्थांच्या सेवेत रूजू होतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे, मागील सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामस्थांना विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता संध्या गुरनुले यांनी अल्पावधीत केल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत केल्या गेले. दरम्यान, याप्रसंगी गावातील ६० वृद्धांना आधारासाठी काठ्याचे वितरण करण्यात आले.
गावांच्या विकासासाठी जिल्हा परिषद व शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना खेचून आणत गावांच्या सर्वागिण विकासाला आपले प्राध्यान्य राहील. या गावातील नागरिकांनाही विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहीण, असेही त्या म्हणाल्या. गावातील पथदिव्यांचे वीज देयकाचा भार कमी करण्यासाठी सोलर सिस्टिम बसविली जात आहे. तर नागरिकांना शुद्ध व गरम पाणी मिळावे, यासाठी सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. यातून ग्राम पंचायतींच्या निधीची बचत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
फिस्कुटी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध -जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे प्रतिपादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2021
Rating:
