तिसऱ्या दिवसाची ही चर्चा निष्फळ! आंदोलनकर्ते आक्रमक, मात्र मुख्याधिकारी व अभियंता रजेवर


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (१७ ऑगस्ट) : भ्रष्ट कारभाराविरोधात गेल्या तीन दिवसापासून मारेगाव नगरपंचायत च्या प्रांगणात प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांचे 'घंटानाद' आंदोलन सुरु आहे. आज मंगळवार ला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, तहसीलदार दीपक पुंडे व कर निरीक्षक तुरणकार यांच्या समवेत चर्चा निष्फळ ठरली. विशेष म्हणजे आंदोलन आक्रमक पवित्र्यात असतांना मुख्याधिकारी, अभियंता रजेवर गेल्याने प्रशासनाच्या पळकटु भूमिकेची वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे.
    
शहरातील प्रभाग क्र. ८ मधील अधिकाराचा दुरूपयोग करीत काँक्रीटीकरण रस्ता कमी बांधकाम करण्यात आले. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून मुख्याधिकारी व अभियंत्यांनी मलिंदा लाटण्याचा गोरखधंदा चालविल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
    
परिणामी मंगळवारी सलग तिसऱ्या दिवसाला घंटानाद आंदोलनाची धग कायम असतांना आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी तहसीलदार दीपक पुंडे व मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह प्रशासकीय प्रतिनिधी तुरणकार आंदोलन स्थळी आले. तहसीलदार पुंडे यांनी जिल्हास्थळी भ्रमणध्वनी वरून चर्चा करीत डिपीओ गावंडे यांनी वेळकाढूपणा दाखवीत थातुरमातुर उत्तरे दिली. तुरणकार यांनी माझ्या अखत्यारीत हे काम येत नसल्याचे गोडीगुलाबीने चुप्पी साधली. यात राजू उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्या मुख्याधिकारी व अभियंता यांना आंदोलन स्थळी हजर करा, अन्यथा मनसे स्टाईल कृतीत उतरविण्याचा गर्भित इशारा दिला.

दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रजा किती दिवस टाकली याबाबत सर्वच अनभिज्ञ असतांना रजेच्या चर्चेला तर्कवितर्क लावल्या जात आहे. शहरातील बोगस कामाचे शिलेदार पळवाटा शोधत असल्याचा आज मात्र, येथे प्रत्यय आला आणि असंतोषही खदखदत होता. आंदोलनाचा उद्या नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
तिसऱ्या दिवसाची ही चर्चा निष्फळ! आंदोलनकर्ते आक्रमक, मात्र मुख्याधिकारी व अभियंता रजेवर तिसऱ्या दिवसाची ही चर्चा निष्फळ!  आंदोलनकर्ते  आक्रमक, मात्र मुख्याधिकारी व अभियंता रजेवर Reviewed by सह्याद्री चौफेर on August 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.