टॉप बातम्या

ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली!


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१८ ऑगस्ट) : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत. 
ग्रामीण भागात उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच आता एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूल'च बरी म्हणत चूल पेटायला लागल्या आहे.

गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर चे भाव गगनाला भीडत आहे. या वाढत्या गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून,
काही भागात मिळत असलेल्या फुकट चे धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा भागवणे चालू झाले आहे. गेल्या काही दिवसामध्ये हाताला काम, मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिंता लागली असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.
Previous Post Next Post