जल जंगल जमीन चे खरे रखवालदार हे मूळनिवासी (आदिवासी) - भारती पाल सरपंच बामणवाडा ग्रा.पं.


सह्याद्री न्यूज : संतोष कूलमेथे 
राजुरा, (०९ ऑगस्ट) : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज राजूरा शहरात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. 
बिरसा मुंडा चौक येथे राष्ट्रीय शहीद बिरसा मुंडा व क्रांतिकारक वीर शहीद बाबुराव शेडमाके ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिन्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुराव मडावी जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा चंद्रपूर, प्रमुख पाहुणे म्हणून भारती पाल सरपंच बामणवाडा, प्रमुख वक्ते वामनजी सिडाम, कविता मडावी, दत्ता भाऊ कवठाडकर ग्राम सेवक, अरुण मेश्राम गट विकास अधिकारी, बिरसा मुंडा वार्ड चे जेष्ठ नागरिक प्रकाश जी मरसकोल्हे साहेब, मेश्राम लाइनमेन साहेब, देवानंद रांझीकर, योगेश कोडापे सर, नंदकिशोर कोडापे सर,  उपस्थिती होते. 
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.मधुकर कोटनाके, धीरज मेश्राम, बाळकृष्ण मसराम, रमेश आडे, संतोष कूलमेथे, वर्षा कोहचाडे, बबन मडावी, लक्ष्मण कुमरे, व आदिवासी समाजाचे बांधवांनी केले. 
   

आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अडचणी अजूनही मार्गी लागलेले नाही त्या मुळे जगातील आदिवासी एक दिवसी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला जातो. विविध वेषभूषा, बोली भाषा, संस्कृती असलेला समाज हा ह्या दिवशी एकत्र येऊन जागतिक मुल निवासी दिवस साजरा करतात. 
   
आदिवासी संस्कृती आधी पासून जल, जंगल, जमीन चे मालक आहेत, त्याचे रक्षण आदिवासी समाजाने केले आहे असे मत भारती पाल ह्यानी बोलून दाखवले, ग्रा.पं. बामणवाडाच्या हद्दीतील खुली जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सर्वांनंद वाघमारे, सुजाता मेश्राम, प्रफुल्ल चौधरी, भारती करमणकर संमिश्रा झाडे, माजी सदस्य तुलाराम गेडाम, ग्राम पंचायत कर्मचारी प्रदीप पाल, मंगेश गेडाम, आकाश करमणकर ह्यांनी झाडे लावून जागतिक आदिवासी दीन साजरा केला. 
   
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व ग्रामपंचाय कर्मचारी व पदाधिकारी ह्याचे स्वागत व सत्कार डॉ. शुभम कुमरे, अभिलास परचाके, सोनल मडावी, सुयोग मसराम, राणी मडावी ह्यांनी केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम मेश्राम ह्यानी केले,तर  उपस्थितांचे आभार संतोष कूलमेथे ह्यांनी मानले.
जल जंगल जमीन चे खरे रखवालदार हे मूळनिवासी (आदिवासी) - भारती पाल सरपंच बामणवाडा ग्रा.पं. जल जंगल जमीन चे खरे रखवालदार हे मूळनिवासी (आदिवासी) - भारती पाल सरपंच बामणवाडा ग्रा.पं. Reviewed by सह्याद्री चौफेर on August 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.