अनेकांच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत योग प्राणायम

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (०९ ऑगस्ट) : शहरात योग प्राणायाम शिबीराचे आयाेजन काल रविवार दि. ८ ऑगष्टला सकाळी ०८:३० वाजता करण्यांत आले . पतंजली योग समिती चंद्रपुरचे जिल्हाध्यक्ष भगवानजी पालकर, महानगर पालिकाचे उपाध्यक्ष तथा आयोजक राहुलजी पावडे, जिल्हा भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष विजयजी चंदावार, जिल्हा पतंजली योग समितीचे महामंत्री अशोक संगिडवार, जिल्हा संघटन मंत्री शरद व्यास, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ददगाल, जिल्हा कोषाध्यक्ष मुरलीधर शिरभय्ये, जिल्हा युवा अध्यक्ष संजीव व्यास, तालुका पदाधिकारी सुधाकर शिरपूरकर, महिला समितीच्या योग विस्तारक महिला कार्यकर्त्या त्याचप्रमाणे संघटनचे पदाधिकारी उपस्थित होते डॉ.दास, सोनी, विकास गहुकर, गुजराथी भवनचे अध्यक्ष, मुर्लिधर शिरभये, सुवर्णा लोखंडे, संतोषवार व असंख्य याेग प्रेमी माेठ्या संख्येंने उपस्थित होते. प्रारंभी नवनियुक्त शिक्षक-शिक्षिकांनी प्राणायाम करुन घेतले. त्यानंतर उपमहापाैर राहुल पावडे यांचे हस्ते योग मार्गदर्शीका पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

दरम्यान भगवानजी पालकर, राजकुमार पाठक, विजय चंदावार, शरद व्यास यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. पाचही संघटन मिळुन स्वामीजीच्या कार्यास हातभार लावत मतभेद दूर करुन योग गंगेचा प्रवाह अधिक वाढविला पाहिजे, असा अमुल्य संदेश या वेळी दिला. महिला पतंजलीच्या सदस्या वैजयंती गहुकर यांनी सुरेख योगनृत्य सादर केले. राहुलजी पावडे यांनी सोमवार दि. ९ ऑगस्ट २०२१ पासुन शहरातील चाफले लॉन येथे नित्य सकाळी ०६:३० ते ०८:०० वाजे पर्यंत योगवर्ग घेतल्या जाईल असे सांगितले. 
अनेकांच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत योग प्राणायम अनेकांच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत योग प्राणायम Reviewed by सह्याद्री चौफेर on August 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.