सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०९ ऑगस्ट) : तालुक्यातील विरकुंड या गावातील काही वार्डांमध्ये अजूनही पक्के रस्ते तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आजही चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. पांदण रस्त्यांपेक्षाही दयनीय अवस्था येथील रस्त्यांची झाली आहे.गावाच्या विकासकामांकरिता मिळणारा निधी जातो तरी कोठे असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. गावात सांडपाणी वाहून नेण्याकरिता नाल्याचं नसल्याने रस्त्यावरूनच सांडपाणी वाहतांना दिसते. त्यामुळे रस्त्यांची गटारं झाली आहेत. घरासमोरच घाणपाणी साचून रहात असल्याने नागरिकांचं आरोग्याचं धोक्यात आलं आहे. ग्रामपंचायत येथील नागरिकांच्या नकळतेपणाचा फायदा घेत विकासकामांना बगल देऊन विकासनिधीची विल्हेवाट लावत आहे. काही वार्डांमध्ये आजही रस्त्यांचा अभाव दिसून येत आहे. पक्के रस्तेच तयार करण्यात न आल्याने या वार्डातील नागरिकांना जाणे येणे करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विरकुंड या गावातील काही वार्डांमध्ये अजूनही पक्के बांधण्यात आले नाही. या वार्डांमध्ये आजही पायवाटाच असल्याने चिखल तुडवूनच मार्ग काढावा लागत आहे. रस्ते विकासाच्या नावावर लोकप्रतिनिधी स्वतःचाच विकास साधत असल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी वाहून नेण्याकरिता गावात नाल्या नसल्याने रस्त्यावरूनच सांडपाणी वाहतांना दिसते. लोकप्रतिनिधींनी विरकुंड या गावाला विकासापासून कोसोदूर ठेवले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करतांनाही विशेष काळजी घेतल्या जात नसून पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापरच होत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
गावामध्ये मागील कित्येक दिवसांपासून निर्जंतुकीकरणाची फवारणीही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढला आहे. रस्ते नाल्यांसारख्या मूलभूत सुविधांपासूनही नागरिक वंचित आहेत. लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणा गावाच्या विकासाला भोवला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींनी गावातील विकासकामांना प्राधान्य देऊन गावातील वार्डांमध्ये पक्के रस्ते व नाल्या बांधून देण्याची मागणी विरकुंड ग्रामस्थांनी केली आहे.
विरकुंड गावातील काही वार्डात आजही आहेत पायवाटाच, पक्के रस्ते बांधण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 09, 2021
Rating:
