राजूर कॉलरी येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, समस्या सोडविण्याकरिता सरपंचांना दिले निवेदन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०९ ऑगस्ट) : राजूर कॉलरी येथिल ग्रामस्थ विविध समस्यांनी त्रस्त असून ग्रामपंचायतेच्या दुर्लक्षिततेमुळे वार्डातील समस्या वाढतच चालल्या आहेत. वार्डातील मूलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष होत असून निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येत आहे. राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ४ मधिल रहिवाश्यांनी वार्डातील समस्यांचा पाढाच ग्रामपंचतेसमोर वाचला असून ग्रामपंच्यायतेचे सरपंच यांना निवेदन देऊन अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

राजूर कॉलरी येथील नागरिक ग्रामपंचायतेच्या दुर्लक्षितपणामुळे कमालीचे वैतागले आहेत. लोकप्रतिनिधी गावातील समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. मूलभूत सुविधांचाही अभाव दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. कोरोनाचा धोका कायम असतांनाच गावात डेंग्यू मलेरियाची साथ आली आहे. संसर्गजन्य आजारांचे थैमान सुरु असतांना गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. कित्येक महिन्यांपासून निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या करण्यात आल्या नाहीत. फॅगिंग मशीन अडगडीत पडल्या आहेत. प्राथमिक दक्षताच घेतली जात नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 संसर्गजन्य आजारांची लागण होऊ लागल्याने नागरिक धास्तीत आले असतांना लोकप्रतिनिधी मात्र निर्धास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. वार्डातील बोरवेल बंद पडल्या असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या बोरवेल दुरुस्त करण्याकडे ग्रामपंचायतेने लक्ष देण्याची गरज आहे. विद्युत खांबावरील लाईट बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रस्त्याने अंधारातुन जाणे येणे करावे लागते. तेंव्हा पथ दिव्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. वार्डातील नाल्यांची वेळेवर सफाई केली जात नसल्याने नाल्या तुंबल्या असून नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. घाण कचऱ्याने नाल्या तुडुंब भरल्याने घाण पाणी नालीमधून न वाहता नालीवरून वाहून नागरिकांच्या घरात शिरत असल्याने त्यांचे आरोग्याचं धोक्यात आले आहे. त्यामुळे त्वरित नाल्यांची साफसफाई करणे गरजेचे झाले आहे. अशा अनेक समस्यांनी वार्ड क्रं. ४ मधील नागरिक त्रस्त असून अनेक दिवसांपासून समस्या सोडविण्याची ओरड होत असतांना लोकप्रतिनिधी मात्र कानात बोळे घालून बसले आहेत. त्यामुळे या वार्डातील नागरिकांनी राजूर कॉलरी ग्रामपंचायतेच्या सरपंचांना निवेदन देऊन येथील समस्यांबाबत अवगत केले आहे. तसेच या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचीही मागणी केली आहे.
राजूर कॉलरी येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, समस्या सोडविण्याकरिता सरपंचांना दिले निवेदन राजूर कॉलरी येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त, समस्या सोडविण्याकरिता सरपंचांना दिले निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.