सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०९ ऑगस्ट) : आज ९ ऑगस्ट रोजी कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. दरम्यान कोविड नियमांचे अधीन राहून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जीवन पा. कापसे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कला शाखेतून प्रथम कु. समीक्षा विलास हनुमंते, द्वितीय कु. वैष्णवी विलास खोके, तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु. स्नेहल पांडुरंग टोंगे, द्वितीय का. सोनाली सुनील टोंगे, या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माननीय जीवन पा. कापसे यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या छोटेखांनी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रा. कु. आवारी, प्रा. सातपुते, प्रा. कुरेकर, प्रा. चिंचोळकर, प्रा.कु. मस्की, प्रा. कु.बेतवार, प्रा. चोपणे, व निलेश बेंडे उपस्थित होते.
गुणवंतांचा गौरव : कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 09, 2021
Rating:
