'नेहरू युवा केंद्र' बीड कार्यालयाच्या व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा आरंभ


सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : नेहरू युवा केंद्र कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आज संपूर्ण जिल्ह्यात नेहरू युवा केंद्रा ची संलग्न असलेल्या युवा मंडळाच्या माध्यमातून आपापल्या गावात सार्वजनिक ठिकाणी, बस स्टँड, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्र, मैदाने आदी ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता विषयावर निबंध प्रतियोगिता स्लोगन प्रतियोगिता व्याख्याने सार्वजनिक ठिकाणी श्रमदान आधी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आज नेहरू युवा केंद्र बीड कार्यालयात स्वच्छते विषयी नाना पाटील यांनी शपथ वाचन करून सर्वाना देण्यात आली असून, कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

 याप्रसंगी रयत सामाजिक प्रतिष्ठानचे बीड सचिव आर. जी. माने, व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान चे नानाभाऊ गव्हाणे, स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचेअमोल जगताप, गहू बाई महिला बहुउद्देशीय संस्थेचे वैजनाथ खोडवे, याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे नानाभाऊ पाटील, प्रमोद जव्हेरी, उदय देशमुख संतोष देवकर, विकास धोत्रे, मनोज पतंगे, जयराज सुरवसे एस. डी. माने आदींची उपस्थिती होती.
'नेहरू युवा केंद्र' बीड कार्यालयाच्या व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा आरंभ 'नेहरू युवा केंद्र' बीड कार्यालयाच्या व रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा आरंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on August 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.