पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकुन गोवंश जनावराचे मांस विक्री करणाऱ्या चार आरोपींना केली अटक


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, ( ०१ ऑगस्ट) :
गोवंश जनावरांची कत्तल करणे व मांस विक्री करण्यावर शासनाने बंदी आणली असतांनाही शहरातील काही भागत सर्हास गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. मोमीनपुरा व रजानगर येथे धाड टाकुन डिबी पथकाने ३२० किलो गोवंश जनावराचे मांस जप्त केले. ही कार्यवाही आज १ ऑगस्ट ला सकाळी करण्यात आली. याठिकाणी गोवंश मासाची विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती डिबी पथकाला मिळाली होती.

डिबी पथकाला मोमीनपुरा व रजा नगर येथे गोवंश जनावराच्या मासाची विक्री केली जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता मोमीनपुरा येथे मो. नासिर मो. राशिद (५१), मो. कैसर मो. अजीज कुरेशी (४५) हे दोघे गोवंश जनावराचे मांस विकताना आढळून आले. तर रजा नगर येथे इस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी (४८), मो. जुबेर अब्दुल मुनफ़ (३५) हे मांसाची विक्री करताना आढळले. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ च्या कलम ५ (ब)(क), ९,९ (अ) व भादंवी च्या कलम १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्हीही धाड़ीत पोलिसानी ३२० किलो गोवंश जनावराचे मांस किमत ६४ हजार रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाही एसडीपिओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डिबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोउपनि आशिष झिमटे, डिबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, गजानन होटगिर, संतोष अढाव, हरिंद्र भरती, पंकज उंबरकर, दिपक वांडृसवार, विशाल गेडाम, संजय शेन्द्रे, सागर सिडाम, पंकज लांजेवार, प्रगती काकडे यांनी केली.
पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकुन गोवंश जनावराचे मांस विक्री करणाऱ्या चार आरोपींना केली अटक पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकुन गोवंश जनावराचे मांस विक्री करणाऱ्या चार आरोपींना केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on August 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.