इनर्विल क्लब वरोराच्या वतीने मुली करिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिर


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१४ ऑगस्ट) : वरोरा इनर्विल क्लब व सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग च्या वतीने मुली करिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वरोरा शहरातील तालुका स्टेडियम मध्ये एका आठवड्या करीता आयोजित करण्यात आले होते.
               
शिबिरामध्ये ८२ मुली सहभागी झाल्या होत्या, या शिबीर मुळे आर्मी, नेव्ही, एरफोर्स मध्ये जाण्याकरिता प्रेरित होईल असा मानस आयोजकांनी केला. या प्रशिक्षणाला आर्मी मधून निवृत्त झालेलें सागर कोहळे (BSF) ने  निवृत्त, प्रवीण चिमुरकर आर्मी ने निवृत्त, रविंद्र तुरांकर, रवी चरूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
     (प्रशिक्षण घेताना मुली व उपस्थित मान्यवर)

यावेळी प्रशिक्षण शिबिराला इनर्विल tक्लब वरोराच्या अध्यक्ष मधू जाजू , सचिव वंदना बोढे, हर्षदा कोल्हे, माया बजाज, स्नेहल पत्तीवार, अपेक्षा पापंटीवार, वैशाली पद्मावार, प्राजक्ता कोल्हे व इनर्विल क्लब वरोरा च्या सदस्यांनी सहकार्य केले.
इनर्विल क्लब वरोराच्या वतीने मुली करिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिर इनर्विल क्लब वरोराच्या वतीने मुली करिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिर Reviewed by सह्याद्री चौफेर on August 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.