सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१४ ऑगस्ट) : मारेगाव तालुका विविध घटनेने हदरल्याचे दिसत आहे. अशातच तालुक्यातील खापरी येथे कौटुंबिक वादाच्या शुल्लक कारणावरून केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाची मृत्यूची झुंज अखेर संपली. आज गुरूवार दि.१२ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्याचा नागपूर येथील मेडिकल कॉलेज मध्ये निधन झाले. मृतक रूपेश सुधाकर कुचनकर रा. खापरी असे त्याचे नाव आहे.
३ ऑगस्टच्या रात्री वेळी रूपेश याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी संशायित आरोपी संकेत हरिश्चंद्र पाचभाई (२१) गौरव पाचभाई (१९) संदीप उरवते रा.खापरी या तीन आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन, वरील घटनेचा पुढील तपास मारेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेंद्र टोगे हे करीत आहे.
तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबे ना!
तर आज १३ ऑगस्ट २०२१ रोजी दांडगाव येथील युवकाने रात्रीच्या सुमारास मार्डा डॅमवरून उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मारेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मृत्यूच्या घटनेत वाढ होत असून, आयेदिन हत्या, आत्महत्या सारख्या विविध घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे.
तालुक्यातील दांडगांव वरून पूर्वेस काही अंतरावर असलेल्या यवतमाळ-चंद्रपूर सीमेला जोडणाऱ्या डॅमवरून पाण्यात उडी घेवुन युवकाने आत्महत्या केल्याने आणखी घटनेत वाढ झाली.
प्रफुल्ल गजानन मत्ते (२५) असे मृताकाचे नाव असून, त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पस्ट असून, प्रफुल्ल यांच्या पाठीमागे आई वडील व एक विवाहित बहिण असा आप्त परिवार आहे.
घोडदरा घटनेतील संशयित आरोपिंच्या पोलिस मागावर:
घोडदरा शेतातील कपाशीच्या पिकात अर्जुनी येथील प्रमोद रामपुरे नामक युवकाचा मृत्यूदेह आढळून आला होता, ही घटना (ता.६ ऑगस्ट) ला उघडीस आल्यानंतर मृतकाच्या भावाने संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाले असून, ते आजही फरारीत च आहे. पोलिस अजूनही त्यांच्या मागावर असून, विविध ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत आहे.
आज त्या घेटनेला ९ वा दिवस उजळला असून, आरोपी जेरबंद झाले नाही. मात्र, प्रमोद, 'चा' का? आणि कशासाठी, व कसा? तिथे पोहचला. चर्चा विविध असल्या तरी त्यामागील कारण आरोपीच सांगेल. या गुढ रहस्याकडे नागाकरिकांच्या नजरा लागल्या आहे. परंतु वरील घटनाक्रम पाहता तालुक्यात सतत काही ना काही घटना घडत असल्याने मारेगाव तालुका हादरल्याचे चित्र दिसून येते.
मारेगाव तालुका हादरला! मार्डा डॅमवरून युवकाने घेतली उडी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
