सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१४ ऑगस्ट) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) महागाव यांचे तर्फे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून "रानभाजी महोत्सव" प्रदर्शन व विक्री चे १३ ऑगस्ट २०२१ रोजी महागाव येथील तहसील कार्यालय परिसरात आयोजन करण्यात आले होते. रानभाजी महोत्सव चे उद्घाटक मा. राणे साहेब तहसीलदार महागाव, प्रमुख पाहुणे आदमुलवाड साहेब (नायब तहसीलदार), मा. तालुका कृषी अधिकारी मुकाडे सर, मा. मंडळ कृषी अधिकारी श्री नंदकुळे साहेब, मा. कृषि पर्यवेक्षक श्री जे. डी. भालेकर साहेब, बि.डी. मेडके साहेब व पाईकराव साहेब उपस्थित होते.
सोशल डीस्टनसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून "रानभाजी महोत्सव" प्रदर्शन व विक्री आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये भाज्या व रानफळे चे प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्याची विक्री महोत्सवामध्ये करण्यात आली. महोत्सवामध्ये विविध रानभाजी व रानफळे चे ओळख, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म इत्यादी सचित्र माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.
रानभाजी महोत्सव कार्यक्रम यशस्वितेकरिता कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी मित्र यांनी परिश्रम घेतले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्य कृषी विभाग व आत्मा कडून रानभाजी महोत्सव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
