सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१४ ऑगस्ट) : तालुक्यातील ग्रामपंचायत मधील रेकॉर्ड पाच ते दहा वर्षांपासून तपासणी होत नसल्याने बऱ्याच ग्रामपंचायती चे अनेक रेकॉर्ड गहाळ होताना दिसून येत आहे. अशाच प्रकार कासारबेहळ येथील ग्रामपंचायतमध्ये आढळून आला आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तत्कालीन सचिव व्ही.एम.काकडे व पी.डी. चांदुले (देशमुख) यांच्या कार्यकाळात सन 2008 मध्ये मृत्यू चे नोंद रजिस्टर गहाळ करण्यात आल्याची लेखी तक्रार माजी सरपंच ताराचंद लक्ष्मण चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सदर गट ग्रामपंचायत कासारबेहळ सेवा नगर येथील नागरिकांच्या रजिस्टर मधील असलेल्या नोंदी मिळेल किंवा नाही अशी ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.
तसेच ग्रामपंचायतीचे सामान्य कर व पाणी पुरवठा कर वसुली करण्यात येते, परंतु त्या नऊ नंबर चे पावती बुक प्रमाणित करण्यात आलेले नसल्याने केलेली वसुली ही बँकेमध्ये जमा न करता सरळ सचिवाच्या खिशात जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते.
महागाव तालुक्यातील ग्रामपंचायती च्या तपासण्या केल्यास मोठया प्रमाणात शासकीय निधीचा अपहार झालेला दिसून येईल. किंबहुना वरील गहाळ रेकॉर्ड वरून लक्षात घेता येईल, तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गहाळ रेकॉर्डकडे दुर्लक्ष न करता या गंभीर प्रकाराकडे जातीने लक्ष घालून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उप तालुका प्रमुख अशोक तुमवार यांनी केली.
तत्कालीन सचिवांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायतीमधील मृत्यू नोंद रजिस्टर झाले गहाळ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
