सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
पुणे, (१७ ऑगस्ट) : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहीलेल्या लोकशाही उत्सव समिती इंदापूर, इंदापूर पत्रकार राष्ट्र सेवा दल इंदापूर तालुका यांच्या वतीने कोरोना काळात स्वतः च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेचे बहुमोल काम केल्याबद्दल पूजा शंकर गेडाम यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
पूजा गेडाम ह्या केळापूर तालुक्यातील गोंडवाकडी या छोटाश्या गावातील रहिवाशी आहे. गेल्या एक वर्षांपासून त्या पुण्यात राहतात. तिथे नर्सिंग म्हणून काम करत असतांना मागील वर्षांपासून देशात कोरोना महामारीचे संकट आल्याने त्यांनी नर्सिंग च्या माध्यमातून या कठीण काळात रुग्णांची सेवा करण्याची इच्छा बाळगून पुण्यातील कोविड सेंटर मध्ये रुग्ण सेवेचे काम करत आहे. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना लोकशाही उत्सव समिती इंदापूर, इंदापूर पत्रकार राष्ट्र सेवा दल इंदापूर तालुका च्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. आयोजक समिती चे श्री.अरुण होळकर अध्यक्ष राष्ट्र सेवा दल इंदापूर, श्री. महेश स्वामी समन्वयक (लोकशाही उत्सव समिती) इंदापूर, श्री. शैलेश काटे (नवराष्ट्र इंदापूर प्रतिनिधी), श्री. विजय शिंदे (एम एच १२ न्यूज) यांनी सन्मानपत्र देऊन पूजा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या प्रसंगी पूजा गेडाम यांनी सन्मान स्विकारून आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले व ७५ वा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
त्यामुळे केळापूर तालुक्यातील युवा लेकीला पुण्यात कोविड सन्मान मिळाल्याने गावात तसेच नातेसंबंधात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पूजा यांचा सामाज माध्यमातून कौतुकासह शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
केळापूर तालुक्याच्या लेकीचा पुण्यात सन्मान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2021
Rating:
