सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नांदेड, (१७ ऑगस्ट) : किनवट येथील जुनी तहसिल इमारत जीर्ण व नादुरुस्त झाल्यामुळे तहसिल कार्यालय हे माघील काही वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत स्थित होती.
सदर तहसिल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोरोना महामारीमुळे ही ईमारत कोरोना काळात कोव्हिड केअर सेंटर साठी वापर करण्यात आली होती त्यामुळे तहसिल इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा उद्घाटना अभावी तहसिल कामकाजाला सुरवात झाली नव्हती परंतु आज १५ ऑगस्ट चे औचित्ये साधून व पालकमंत्री मंत्री, महसूल मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला.
जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण२०१४-२०१५ अंतर्गत नविन तहसिल इमारतीच्या कामास ४८१ लक्ष रुपयाची शासकीय मान्यता देण्यात आली, सदर तहसिल इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २५ जून २०१६ ला जोगदंड कन्स्ट्रक्शन नांदेड यांच्या नावे कार्यालयीन आदेश प्राप्त झाले, व ते काम कोंडे कन्स्ट्रक्शन किनवट यांनी केले.
सदर तहसिल इमारतीसाठी जी प्लस वन दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेड, संरक्षण भिंत, कार्यालयीन परिसरात बोअरवेल इ. कामाचा समावेश आहे आणि सदरील नवीन तहसिल कार्यालय इमारतीचे जोता क्षेत्र १८६३ एवढे आहे.
इमारतीच्या तळ मजल्यावर तहसीलदार यांचे कॅबिन, नायब तहसीलदार यांचे कार्यालय, निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, स्ट्रॉंग रूम, तालुका कोषगार कार्यालय व पहिल्या मजल्यावर मीटिंग हॉल, कॉन्फरन्स हॉल, तालुका भूमी अभिलेख असून तहसिल इमारतीच्या मधील बाजूस प्रकाश आणि वायू वेचण्याकरिता प्रशस्त कोट्याड आहे.
सदर प्रशस्त तहसिल कार्यालयात तहसिल कार्यालयासोबत भूमी अभिलेख कार्यालय व तालुका कोषगार कार्यालय यांचा समावेश आहे. किनवट येथील प्रशस्त तहसील इमारतीचे बांधकाम झाल्याने आणि विविधी कार्यालय हे एकाच छताखाली आल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना सोयीचे झाले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. किर्तीकुमार पुजारी- (सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट) यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नामदार श्री अब्दुल सत्तार (राज्य मंत्री महसुल, ग्रामविकास, बंदरे,खार जमीन विकास, विशेष साहाय्य महाराष्ट्र राज्य) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदवला, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. नामदार श्री बाळासाहेब थोरात- ( महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण-( सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालक मंत्री नांदेड जिल्हा) यांनी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग नोंदविला तर लोकप्रिय आमदार मा. श्री भीमरावजी केराम साहेब यांनी दीपप्रज्वलन करून नाम फलकाचे अनावरण केले आणि नागरिकांशी संवाद साधला आणि डॉ. मृणाल जाधव- तहसीलदार किनवट यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे श्री अशोकरावजी चव्हाण साहेब- बांधकाम तथा पालकमंत्री नांदेड जिल्हा, श्री बाळासाहेबजी थोरात- महसूल मंत्री, श्री अब्दूलजी सत्तार साहेब- ग्रामविकास, महसूल, बंदरे मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. डॉ. विपीन इटनकर- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, तर प्रत्येक्ष उपस्थिती लोकप्रिय आमदार मा. श्री भीमरावजी केराम साहेब- किनवट-माहूर विधानसभा, मा. श्री किर्तीकुमार पुजार सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, डॉ. मृणाल जाधव मॅडम- तहसीलदार किनवट व व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विशेष उपस्थिती मंगाराणी आंबूलगेकर- अध्यक्ष जिल्हापरिषद नांदेड, मा. खासदार हेमंत पाटील- हिंगोली लोकसभा मतदार संघ, मा. आमदार विक्रम काळे- विधानपरिषद सदस्य, मा. आमदार सतीश चव्हाण- विधानपरिषद सदस्य, मा. आमदार राम पाटील रातोळीकर- विधानपरिषद सदस्य, मा. आनंद मच्छेवार- नगराध्यक्ष किनवट, हिराबाई आडे- पंचायत समिती सभापती किनवट, आमदार साहेब जनसंपर्क अधिकारी संतोष मरस्कोल्हे, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, व सर्व पत्रकार बंधू किनवट आणि इतर सर्व शहरातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
किनवट येथे नवीन प्रशासकीय तहसील इमारतीचा शुभारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2021
Rating:
