सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑगस्ट) : घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड महिला कार्यकर्त्यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण नुकताच घुग्घुस येथे साजरा करण्यात आला. उपराेक्त कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या महिला सदस्या नितुताई जैस्वाल यांनी केले होते.
सदरहु कार्यक्रमाला उषा आगदारी, जनाबाई निमकर, माया मांडवकर, गिता बोबडे, सुनिता चुने, विना गुच्छाईत, सुजाता देशकर, बेबी नागतुरे, सलमा सिद्धीक्की, सविता गोहने, जोत्सना मस्के, कामिना देशकर आदीं महिला सदस्या उपस्थित हाेत्या.
घुग्घुसला रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न - आ.जाेरगेवारांची उपस्थिती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2021
Rating:
