एकाच दिवशी दोघांच्या मृत्यूने गावात पसरली शोककळा


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३१ ऑगस्ट) : मुसळधार पाऊस झाला आणि वणी तालुक्यातील सोनापूर येथील दोन इसम पुरात वाहून गेले. त्यात सतीश मधुकर देठे (४०) तर राजेंद्र नामदेव उईके (४१) असे वाहून गेलेल्या इसमांची नाव आहेत. ही घटना ३० ऑगस्टला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडीस आली, त्या रोजी वणीसह सोनापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला, बघता बघता नाले ओढे भरून वाहू लागले होते. मात्र, पाऊस कमी झाला समजून दोघेही राजूर येथे काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले असता, ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील सतीश देठे यांचा मृत्यूदेह सकाळी सापडला होता. परंतु राजेंद्र उईके हा बेपत्ता होता. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरु होता, दुपारी राजेंद्र चा ही मृत्यूदेह काही अंतरावर आढळून आला. राजेंद्र यांचा मृत्यूदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. या घटनेने सोनापूरात शोककळा पसरली. 
एकाच दिवशी दोघांच्या मृत्यूने गावात पसरली शोककळा एकाच दिवशी दोघांच्या मृत्यूने गावात पसरली शोककळा  Reviewed by सह्याद्री चौफेर on August 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.