मुलानेच काढले जन्मदात्या आईला घराबाहेर, वयोवृद्ध आजार ग्रस्त महिलेला नागपूरच्या संताजी ब्रिगेडने दिला आधार
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे मुख्य संस्थापक अजयभाऊ धोपटे यांना चित्राताई माकडे यांनी फाेन करुन सांगितले की, स्थानिक दत्तात्रय नगर येथे तीन दिवसांपासून एक वयोवृद्ध महिला रस्त्यावर पावसात झोपून आहे. इतकेच नाही तर ती फार आजारी आहे. त्याच क्षणी कुठलाही वेळ न लावता तात्काळ अजय धाेपटे यांनी ही माहिती संताजी ब्रिगेडच्या टीमला दिली. रवींद्र महाजन यांच्या स्कार्पिओ गाडीने अवघ्या दहा मिनिटात ती टीम त्या ठिकाणी पोहचली. वस्तीतील काही नागरिकांनी त्या वृद्ध महिले बद्दल माहिती देताना सांगितले की, प्रॉपर्टीच्या वादामुळे तिच्याच मुलांने या वृद्ध महिलेस तीन दिवसापूर्वी या ठिकाणी सोडून दिले आहे. टीमने सर्वप्रथम तिच्या मुलाला फोन करून त्या ठिकाणी बाेलिवण्याचा प्रयत्न केला असतांना त्याच वेळी त्या स्थळी त्या वृद्ध महिलेची बहीण आली व तिने सांगितले की या वृद्ध महिलेच्या मुलाच्या भीती पाेटी आम्ही हीची मदत करण्यास असमर्थ झालाे हाेताे. पण आज तुमची टीम आल्यामुळे आमच्यात माेठी हिंमत आली आहे. आता मी तिला आपल्या घरी ठेवून तिची सेवा करण्यास तयार आहे. अशी ती या वेळी म्हणाली. संपूर्ण टीमने त्या वृद्ध महिलेस आधार दिला व सदरहु वृद्ध महिलेस तिच्या बहिणीच्या घरी सुखरुप रित्या पाेहचवून दिले. दरम्यान, याच वेळेस त्या पीडित आजार ग्रस्त वृद्ध महिलेचा मुलगा तेथे आला. टीमने त्याला समजून सांगितले यानंतर तू आईला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर तुझी गाठ आमच्याशी आहे. तेव्हा त्याने टीमची माफी मागितली.
या टीमने त्या वृद्ध महिलेची जबाबदारी तिच्या पोराला न देता.तिच्या सख्ख्या बहिणी वर साेपविली वयाेव्रूध्द महिलेला मदत करण्यांस संताजी ब्रिगेडचे विजय भाऊ हटवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, गजानन तळवेकर मुख्य संघटक, रुपेश तेल मासासरे कोषाध्यक्ष, मंगेश साकरकर सहसंघटक, रवींद्र महाजन वरिष्ठ सल्लागार, रवींद्र बावनकर वरिष्ठ सल्लागार, परेश भानारे उपाध्यक्ष नागपूर शहर यांची माेलाची मदत लाभली.
मुलानेच काढले जन्मदात्या आईला घराबाहेर, वयोवृद्ध आजार ग्रस्त महिलेला नागपूरच्या संताजी ब्रिगेडने दिला आधार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2021
Rating:
