सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२३ ऑगस्ट) : कोरपना तालुक्यातील औद्योगिक परिसर नांदाफाटा येथे उन्हाची पर्वा न करता चटके सोसत नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरणासाठी रांगेत उभे असून यात महिलाही मोठ्या प्रमाणात आहे.
औद्योगिक परिसर व लोकसंख्येचा बाबतीत मोठे शहर म्हणून नांदा ला ओळखल्या जाते. मागील एक महिन्या पासून कोविड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने नागरीकांना इतरत्र केंद्रांचा शोध घ्यावा लागत होता. परंतु आता लस उपलब्ध झाली असल्याने लोकांची गर्दी वाढत चालली आहे. नागरिकांची केन्द्रावर रीघ वाढत आहे मात्र, लसीकरणाकरिता तास न तास ताटकळत राहवे लागत आहे. तसेच पिण्याचा पाण्याची व बसण्याची सुविधा नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सांस्कृतिक भवन येथे लस केंद्र सुरू आहे. भवन भव्य असून या ठिकाणी २०० नागरिक बसण्याची सुविधा आहे मात्र, उचित व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहवे लागत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे. आरोग्य विभागाने टोकन पध्दतीचा वापर केल्यास नागरिकांना विनाकारण उन्हाचे चटके सोसावे लागणार नाही लसीकरण केंद्रांवर फक्त ग्रामपंचायतीकडून मदत केली जात आहे.
महसूल, पोलिस, कृषी विभाग व शिक्षण विभागाचे कर्मचारी नांदा येथील लसीकरण केंद्रावर दिसत नाही त्यामुळे गर्दीचा ताण आरोग्य विभागावर पडत आहे, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी लसीकरण मोहिमेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उन्हाच्या पाऱ्यात टोचुन घेत आहे नागरिक लस, सोई सुविधांचा अभाव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 23, 2021
Rating:
