सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२३ ऑगस्ट) : भुरट्या चोरांनी शहर व तालुक्यात चांगलाच उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी चोरीचे सत्रच सुरु केले असून, गाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. गाढ झोपेत असतांना नागरिकांच्या घरात शिरून चोरटे आपला चोरीचा डाव साधत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेवर रात्र जागती करण्याची वेळ आली आहे. तसेच बंद घरांना टार्गेट करून घरफोडी कारण्याचाही चोरट्यांनी सपाटा लावला आहे. हाती लागेल त्या वस्तू व साहित्य चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहे. या भुरट्या चोरांनी आता बंद शाळांनाही टार्गेट करणे सुरु केले आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळाही आता चोरट्यांच्या रडारवर आल्या आहेत. बंद शाळांचे कुलूप तोडून शाळेतील महत्वपूर्ण वस्तूंचीही चोरी होऊ लागल्याने शाळा महाविद्यालयेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांआधी चोरट्यांनी पोस्ट ऑफिसमधेही चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये चोरट्यांनी चोरीचा डाव साधला असून शाळेतील तिन इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टर चोरून नेले आहे. शाळेत अध्यापना करिता या प्रोजेक्टरचा वापर केल्या जातो. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने महत्वाचे विषय या प्रोजेक्टरमधून स्क्रीनवर रिफ्लेक्ट करून शिकविले जातात. हे प्रोजेक्टरच चोरट्यांनी चोरून नेले आहे. शाळेत चोरी झाल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी पोलिस स्टेशनला नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये २१ ऑगष्टला रात्री दरम्यान चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेत अध्यापनाकरिता वापरण्यात येणारे तिन प्रोजेक्टर चोरट्यांनी चोरून नेले. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश नामदेवराव पालवे (४२) रा. छोरीया ले-आऊट हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्यावरून आल्यानंतर ते शाळेत गेले असता त्यांना शाळेत चोरी झाल्याचे आढळून आले. शाळेतील तिन प्रोजेक्टर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आज २३ ऑगष्टला पोलिस स्टेशला येऊन शाळेत चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. शाळेतील तिन इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टर चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांनी तक्रारीत नोंदविले आहे. मुख्याध्यापक अविनाश पालवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय डोमाजी भादीकर करित आहे.
शहरातील न.प. शाळा क्रमांक २ मधील तिन प्रोजेक्टर चोरट्यांनी केले लंपास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 23, 2021
Rating:
