सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (२३ ऑगस्ट) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. मारेगाव तालुक्यामध्ये मलेरिया टायफाईड डेंग्यू सदृश्य आजाराची लागण भरपूर प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये सर्वेक्षण करून योग्य ती उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे. असे मारेगाव पंचायत समिती चे उपसभापती संजय आवारी यांनी आरोग्य विभागाला एका पत्रकाद्वारे कळविले आहे. आपल्या विभागामार्फत लवकरात लवकर सर्वेक्षण करण्यात यावे. परिणामी तालुक्यामध्ये आजाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असेही ते म्हणाले.
पंचायत समिती उपसभापती यांनी व्यक्त केली नाराजी: गावोगावी मलेरिया टायफाईड डेंग्यू चे आजार वाढत असल्याचे चित्र आढळून येते. त्यामुळे ग्रामसेवकांनी वरील सदृश्य आजाराकडे दुर्लक्ष न करता गावात फॉगिंग त्वरित करून घ्यावी, आपण याकडे दुर्लक्ष करीत आहात. शिवाय संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही टाळता येईल, याबाबत पं स उपसभापती संजय आवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गावागावातील फॉगिंग करून त्याचे फोटो काढून संबंधित ग्रुपवर टाका, असे आदेश गट विकास अधिकारी पं स मारेगाव यांनी दिले आहे.
आरोग्य विभागाने मारेगाव तालुक्यात सर्वेक्षण करावे - उपसभापती संजय आवारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 23, 2021
Rating:
