लल्ला भाऊ दिंडे,मित्र परीवारांनी दिव्यांगांना ड्रेस व मछर दानी केली वाटप

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
पुसद, (२३ ऑगस्ट) : आज दि.२२ ऑगस्ट नारळी पौर्णिमा रक्षाबंधन बहिणीची रक्षा करण्यासाठी भावाला असलेले बंधन आज लल्लाभाऊ दिंडे व गुरू भैया उचाडे यांच्या नेतृतवाखाली रुग्ण मित्र चॅरिटेबल ट्रस्ट व रक्त संजीवनी पुसद संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिव्यांग संघ पुसद येथे दिव्यांग भाऊ बहिणी सोबत रक्षाबंधन साजरा केला.

दिव्यांग बांधवासाठी मच्छर दानी व बहिणीसाठी ड्रेस भेट म्हणून दिले, पुसद शहरात येवढ्या कलानी निपूर्न असलेले दिव्यांग बांधव पाहायला मिळाले. या राष्ट्रीय दिव्यांग संघा बद्दल पुसद मध्ये कुणालाच माहिती नाही, याचीच खंत आपण गोविंद नगर पुसद राष्ट्रीय दिव्यांग संघ येथे अवश्य भेट द्यावी. या छोटेखानी कार्यक्रमाला लल्ला भाऊ दिंडे, गुरू भैया उचाडे, शंतीसागर भाऊ इंगोले, ऋषीकेश टनमने, विकास चव्हाण, स्वयम् राठोड, विठल डाखोरे, सुधीर पाटील, राज वाशिमकर, करण गायकवाड, अजय गुजर, संदीप शिंदे, अक्षय साबळे व समसत मित्र परिवार उपस्थित होते.

मित्र परिवारांच्या मदतीने मुक्या जनावराचा ऑन द स्पॉट उपचार :
काल माध्यमात प्रसिद्ध केलेल्या एका गाईची पोस्ट, आज सकाळी पुसद परिसरात गाय आढळल्याचे सुमित बागेल यांचा कॉल आला. या नंतर लल्ला दिंडे, यश जयस्वाल, रवी शेंद्रे, अमरदिप जयस्वाल, शांती सागर, इंगोले, अमय टारफे, लखन ढेकळे, भैया कवटाळे, अक्षय धुळे, गणेश देशमुख, विनोद चव्हाण, व समस्त मित्र परिवार उपस्थितीत गायीला पकडून तिची मानेची दोरी सोडण्यात आली व तिला झालेली जखमेच्या ठिकाणी हळद भरून उपचार करण्यात आला.

डोळ्यांनी न पाहवल्या जाणाऱ्या त्रासातून वरील मित्र परिवारांनी मिळून गाईला आरोग्य मुक्त करण्यात आले. यावेळी गायीच्या जखमेवर हळद भरून झालेल्या अळ्या काढण्यात आल्या. 

मित्र परिवारांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे असून, सर्वत्र कौतुक होत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आपण आपल्या जवळील निदर्शनास येत असलेल्या मुक्या प्राण्यांना अशा त्रासातून मुक्त कराल अशी अपेक्षा मित्र परिवारातर्फे करण्यात आली आहे.




लल्ला भाऊ दिंडे,मित्र परीवारांनी दिव्यांगांना ड्रेस व मछर दानी केली वाटप लल्ला भाऊ दिंडे,मित्र परीवारांनी दिव्यांगांना ड्रेस व मछर दानी केली वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on August 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.