टॉप बातम्या

तेरणा हायस्कूल एन-6 सिडको औरंगाबाद येथील कार्यरत क्रीडा शिक्षक रमेश प्रधान यांना आदर्श क्रिडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार !


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (३१ ऑगस्ट) : राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रमेश प्रधान यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आज पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भारत सरकार मा.ना.डाॅ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.राजेंद्र दर्डा हे होते. क्रीडा महर्षी डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर तसेच संस्थापक अध्यक्ष मा.सचिन मुळे यांच्या हस्ते आदर्श क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार गौरव प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम भानुदास चव्हाण हाॅल येथे संपन्न झाला.
Previous Post Next Post