लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारी भाजपा महापौर व आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करा - नगरसेवक देवेंद्र बेलेंची मागणी
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज चंद्रपूर शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली, ही सभा ऑनलाइन असल्याने नगरसेवकांना सभागृहात येणे बंधनकारक होते, परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये कुठे ही येण्यास बंदीचे आदेश नसतांना मनपातील महापौर व आयुक्तांनी नगरसेवकांना महानगरपालिका गेट वर आत येणाऱ्या नगरसेवकांना पोलीस बंदोबस्त ठेवून आत येऊ दिले नाही.
आज जी घटना घडली ती महानगरपालिका इतिहासात पहिल्यांदाच घडली की, लोकशाही मध्ये महानगरपालिका सदस्यांनाच पालिका मध्ये येऊ न देणे म्हणजेच लोकशाही ला काळिमा फासण्याचे काम या भ्रष्ट्राचारी भाजपा महापौर यांनी केले व याला दुसरे भ्रष्ट्राचारी आयुक्त यांनी साथ दिली.
नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये आत येऊ न दिल्याने महानगरपालिका गेट जवळच गट नेते पप्पू देशमुख, काँग्रेसचे देवेंद्र बेले, नंदू नागरकर, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, या नगरसेवकानी स्वतः चे शर्ट काढून महापौर व आयुक्ताचा निषेध करून यांच्यावर सिटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार आंबोरे यांना पत्र देऊन फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.
तसेच या भ्रष्टाचारी महापौर व आयुक्तांना सद्बुद्धी देवो म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सदरहु आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, आदिसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारी भाजपा महापौर व आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करा - नगरसेवक देवेंद्र बेलेंची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2021
Rating:
