तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३१ ऑगस्ट) : तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचा कारभार मागील अनेक वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही अर्जाकडे ढुंकूनही बघायचे नाही. असा अलिखित कायदाच येथे तयार केल्याचे दिसत आहे.
    
२०२१-२२ आर्थिक वर्षापासून फेरफार आभासी पद्धतीने सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून शेकडो फेरफार प्रकरणे प्रलंबित असून आभासी पद्धत असल्याने दिरंगाई होत असल्याचे चे उत्तर सर्वांना देण्यात येत आहे. शिवाय मार्च, एप्रिलमधील काहींचे अर्ज गहाळ झाले असून, कोणीही याकडे लक्ष द्यायला देण्यास तयार नाही. कार्यालयात अधिकारी कधी येतात कधी जातात हा मोठा संशोधनाचा विषय असून,कनिष्ठ कर्मचारी सुद्धा अधिकारी नसल्याने बराच काळ बाहेर घालवीत असतात चौकशी केली तर साहेब मिटींगला गेले. मोजणीसाठी गेले असे उत्तर मिळते.
    
शेतकरी बांधवांना कृषी कर्जासाठी नकाशा सक्तीचा केला असून, त्यांचे अत्यल्प शुल्क असूनही १०० रुपये घेतल्याशिवाय नकाशा दिला जात नाही. कुणी नियमाप्रमाणे शुल्क दिले तर आठ दिवस नकाशाच दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना नाहक तुटल्या जात आहे.
        
अशातच एका विधवा महिलेस घरकुल मंजूर झाले. त्यासाठी तिने ५ महिन्यापूर्वी फेरफारचा अर्ज दाखल केला होता. त्यात ५ रुपयाची टिकीट नसल्याने अर्ज हेतूपरस्पर प्रलंबित ठेवण्यात आला. विधवा महिलेने पोचपावती वर तिकीट असल्याचे दाखवून दिल्याने तो अर्ज पुन्हा घेतला. या विधवा महिलेस ५ महिन्यापासून चकरा मारावयास लावूनही तिथे फेरफार न झाल्याने तिचे घरकुल वापस गेले. त्यामुळे ही महिला हक्काच्या घरापासून वंचित झाल्याने येथील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर लगाम कोणी लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ Reviewed by सह्याद्री चौफेर on August 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.