जीएम टेक्नॉलॉजी ट्रायल वरची बंदी उठवावी म्हणून प्रत्येक गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवा - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांचे आवाहन
सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (३१ऑगस्ट) : तालुक्यातील वागद ईजारा या गावी ग्रामपंचायत कार्यालय वर कृषी विभाग व बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या गावात शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षितता अभियानाअंतर्गत दक्षता बाबत मार्गदर्शन करून गुलाबी बोंड अळी च्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांचे दैवत हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बायर कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी कीर्तिराज राजूभाऊ चिद्दरवार, सुरेश राठोड, अविनाश राठोड गायकवाड, भालेकर साहेब कृषी पर्यवेक्षक व डाखोरे साहेब कृषी साहाय्यक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबोधित करत असतांना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले की, सध्या उपलब्ध असलेले कॉटन सीड BG-1, BG-2 हा आता यामधील रोगप्रतिकारक शक्ति पूर्णतः संपलेली असून,ही कापूस वाण कालबाह्य झालेली आहे. केंद्र शासनाने जीएम टेक्नॉलॉजी जेनेटिक मॉडिफाइड या कॉटन सीड वर या कृषिप्रधान देशामध्ये ट्रायल वर बंदी घातल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली. जगामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मसात करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धता मिळाली आहे. पण दुर्दैवाने या कृषिप्रधान देशामध्ये मूठभर लोकांच्या मागणीवरून केंद्र शासनाने या ट्रायल वर बंदी घातल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोंडमारा होतोय, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेऊन गावागावातून ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे ही जीएम टेक्नॉलॉजी वरची बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून करावी असे आवाहन केले.
यावेळी बाहेर कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी किर्तीराज गायकवाड यांनी गुलाबी बोंडअळी च्या व्यवस्थापनासाठी यथोचित मार्गदर्शन केले व त्यासोबत फवारणी करत असतांना सुरक्षा किटचा वापर व त्यासंबंधाने घ्यावयाची काळजी दक्षता,याबाबत उपयुक्त मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलं. कापूस या पिकामध्ये फेरोमोन ट्रॅप कामगंध सापळे ट्रायकोडरमा व फवारणी या संदर्भाने वापरण्यासाठी कीटक नाशकाचा वापर कसा करावा, या संदर्भाने मार्गदर्शन झाले. यावेळी फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना कृषी विभाग व बाहेर कंपनीच्या वतीने फवारणी सुरक्षा कीटचे वाटप मनीष भाऊ व राजूभाऊ चिद्दरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला या गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश भाऊ जाधव नेहमीचं जाधव, दाऊ काळे, दिगंबर देवकर, रवि राठोड, देवराव राठोड, भारत चव्हाण, उमेश प्रल्हाद राठोड, रोहिदास पवार, शासन व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड-19 सारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावाची आदर्श आचारसंहितेचे पालन करून या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भाऊ राठोड बायरचे प्रतिनिधी यांनी केले.
जीएम टेक्नॉलॉजी ट्रायल वरची बंदी उठवावी म्हणून प्रत्येक गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवा - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांचे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2021
Rating:
