सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३१ ऑगस्ट) : चिमूर तालुक्यातील बाजारपेठे साठी प्रसिध्द असलेल्या नेरी येथील व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच गुप्त मतदान पध्दतीने आज अटीतटीची निवडणूक पार पडली. एरव्ही ही निवडणूक सर्वानुमते हाेवून पदाधिका-यांची निवड कार्यकारणीत केल्या जात असे.! विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी व्यापारी वर्गांतुन सतिश आष्टनकर, विलास चांदेकर, व मंगेश चांदेकर यांनी आपले अर्ज दाखल केले. गुप्त मतदान पध्दतीने मतदान हाेवून त्यात सतिश आष्टनकर व विलास चांदेकर हे पराभूत झाले. सर्वाधिक मते मंगेश चांदेकर यांनी प्राप्त केले. या निवडणूकीत मंगेश चांदेकर यांचे विजयाची बातमी कानांवर येताच अनेक चाहत्यांनी व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, उपाध्यक्षपदी सुरेश पिसे, सचिवपदी राजु विश्वनाथ पिसे, सहसचिव पदी रवि चुटे, तर काेषाध्यक्ष पदाकरिता विलास टिपले यांनी नविन कार्यकारणीत स्थान मिळविले. या शिवाय सदस्य पदी धनराज पंधरे, देवा कामडी, चांदखाँ पठाण , मुस्तुफा शेख, अशाेक सिताराम पिसे, मिलिंद वाघे, रिजवान अजानी, विनाेद लक्ष्मण कामडी, बाबूराव पिसे, व शैलेश शेणमारे यांची निवड करण्यांत आली. ही निवडणूक प्रक्रिया नेरी व्यापारी असाेसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष सुरेश कामडी यांनी पार पाडली. सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना त्यांनी शुभेच्छा या वेळी प्रदान केल्या. गुप्त मतदान पध्दतीने प्रथमच पार पडलेल्या या निवडणूकीची चर्चा अख्ख्या चिमूर तालुक्यातील व्यापारी वर्गांत आज ऐकावयास मिळाली. हे विशेष !
नेरी व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी अटीतटीची निवडणूक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 31, 2021
Rating:
