(संग्रहीत फोटो)
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२१ जुलै) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून रायगड आणि पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने बुधवार ते शुक्रवार दरम्यान मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
