वेकोलीशी अधिनस्त असलेल्या सद् भाव कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळाले नाही तीन महिन्यापासून वेतन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२१जुलै) : कोलारपिंपरी येथील सद् भाव इंजिनिअरिंग प्रा.लि. कंपनीशी संलग्न असलेल्या एस.के. खैतान प्रा.लि. कंपनीतील कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने अडचणीत आले आहे. वेकोलीशी अधिनस्त असलेल्या या कंपनीचे मागील चार महिन्यांपासून काम बंद असून कंपनीचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी वर्ग कंपनीमध्येच येत नसल्याने कर्मचारी काळजीत आले आहेत. तीन महिन्यांपासून कंपनीचे कर्मचारी पगार मिळेल या आशेने कंपनीत चकरा मारत आहेत. पण कंपनी व्यवस्थापन त्यांची घोर निराशा करत आहे. तीन महिन्यांपासून पगारच न झाल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदर्निवाहाचे संकट निर्माण झाले आहे. कंपनीने आठ दहा दिवसांत कर्मचाऱ्यांना पगार न दिल्यास कंपनीच्या गेटसमोर उपोषणाला बसण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शविली आहे. 
वेकोलिच्या अधिनस्त असलेल्या सद् भाव इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीशी संलग्न असलेली एस.के. खैतान प्रा.लि. ही हेव्ही वर्क कंपनी भूगर्भातून कोळसा काढून देण्याच्या करारावर कोलारपिंपरी कोळसा खदाणीमध्ये कार्यरत आहे. या कंपनीने अतिशय संत गतीने काम केल्याने या कंपनीवर वेकोलिने डाँम्रेजही आकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपनीच्या पुढील कराराविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या कंपनीने चार महिन्यापासून कोळसा उत्खननाचे काम बंद केले असून कंपनीचे व्यवस्थापक कंपनीतून गायब झाले आहे. कंपनीमध्ये नाममात्र दोन पर्यवेक्षक उपस्थित असून ते कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीत. सद् भाव कंपनीचे व्यवस्थापक म्हणून राजकुमार यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी होती. पण त्यांनीही कंपनीत येणे बंद केले असून फोनही बंद केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. या कंपनीमध्ये पाचशेच्यावर कर्मचारी कार्यरत असून कंपनीने त्यांचा तीन महिन्यांपासून पगार न दिल्याने त्यांच्यावर उदर्निवाहाचे संकट निर्माण झाले आहे.

राजकुमार यांच्याकडे कर्मचारी नियुक्त करण्यापासून तर त्यांच्या पगाराची व्यवस्था कारण्यापासूनची जबाबदारी होती. पण आता त्यांनीच कंपनीकडे पाठ फिरविल्याने कर्मचारी विचाराधीन झाले आहेत. पगार मिळेल या आशेने रोज कर्मचारी कंपनीचे उंबरठे झिजवत आहे. पण निराशाच त्यांच्या हाती लागत आहे. कंपनीचा संपूर्ण कॅम्प रिकामा झाला असून सर्वच स्टाफ कंपनीतून गायब झाला आहे. जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याने जाब विचारावा तरी कुणाला या विवंचनेत कर्मचारी आले आहेत. शिफारशींचा बाजार गरम करणारेही आता कर्मचाऱ्यांचा पगार काढून देण्यास पुढे येत नसल्याची खंत व्यक्त केल्या जात आहे. तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होऊ लागली असून सात आठ दिवसांत पगार न मिळाल्यास कंपनीच्या गेट समोर उपोषण करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दर्शविली आहे.
वेकोलीशी अधिनस्त असलेल्या सद् भाव कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळाले नाही तीन महिन्यापासून वेतन वेकोलीशी अधिनस्त असलेल्या सद् भाव कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळाले नाही तीन महिन्यापासून वेतन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.