चंद्रपूर जिल्हा कारागृहात धक्कादायक प्रकार: बाथरुममध्ये कैद्याची गळफास घेत आत्महत्या


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (२० जुलै) : चंद्रपूर येथील स्थानिक जिल्हा कारागृहातील प्रसाधनगृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. उमेश दामाजी नैताम असे मृत कैद्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण कारागृहात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश दामाजी नैताम हा २५ वर्षीय आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरी टोला येथील रहिवासी असून तो हत्येच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली चंद्रपूर येथील कारागृह वर्ग १ येथे १७ नोव्हेंबर २०२० रोजी दाखल झाला होता.

दरम्यान, आज बुधवारी दुपारच्या सुमारास उमेश दामाजी नैताम या आरोपीने जिल्हा कारागृहातील प्रसाधनगृहात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याची माहिती कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. 
चंद्रपूर जिल्हा कारागृहात धक्कादायक प्रकार: बाथरुममध्ये कैद्याची गळफास घेत आत्महत्या चंद्रपूर जिल्हा कारागृहात धक्कादायक प्रकार: बाथरुममध्ये कैद्याची गळफास घेत आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.