जिल्हा रुग्णालय बीड च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (२१ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा आरोग्य यंत्रणा विविध उपक्रम राबवत आहे. जिल्हाभर विविध उपक्रमासह माध्यम समुहातील सर्व पत्रकार, कर्मचारी, कॅमेरामन, संगणक परिचालक यांचे आरोग्य तपासून दिले जाणार आहे. उद्या दिनांक २२ जुलै २०२१ला 
सकाळी 10:00 वाजेपासून सुरु होणार असून, स्थळ सिव्हील हॉस्पिटल बीड येथे आयोजित केला आहे. असे  डॉ. सुरेश साबळे जिल्हा शल्यचिकित्सक बीड व डॉ. एकनाथ माले आरोग्य उपसंचालक लातूर यांनी माहिती दिली आहे.

कोरोना च्या काळात पत्रकारांनी उचललेली जोखीम आणि जबाबदारी ही आदर्श सेवा आहे. म्हणूनच आपले आरोग्य, आमची जबाबदारी असल्याचे आम्ही समजतो. जिल्हा रुग्णालय बीड, सर्व तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालयाकडून आयोजित उपक्रमात रक्तदाब, शुगर, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, अँटीजन (ऐच्छिक) केले जाणार आहे. सर्व दैनिक व इलेक्ट्रॉनिक माध्यम बंधूंना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक बीड च्या वतीने करण्यात आले.
 



जिल्हा रुग्णालय बीड च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालय बीड च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.