सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
मुंबई, (१३ जुलै) : पालघर तालुका काँग्रेस कमिटी आयेजित केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डीझेल, गॅस सिलिंडर ,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.नामदार नाना भाऊ पटोले साहेबांच्या आदेशानुसार मा.परागजी पस्टे साहेब (महाराष्ट्र किसान काँग्रेस अध्यक्ष) व पालघर तालुका अध्यक्ष श्री.राजेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दि.१३ जुलै२१ रोजी सकाळी १०.०० वाजता पालघर शेलवली येथील पेट्रोल पंपावर साह्यांची मोहीम घेण्यात आली तसेच ११.०० वाजता मनोर बसस्टँड ते भारत पेट्रोलियम मस्तान नाका पर्यंत सायकल रॅली काढून सह्यांची मोहिम घेण्यात आली.
सदर आंदोलनात पा.जिल्हा कार्याध्यक्ष श्री. रुफी भूरे, श्री.मधुकर चौधरी, मा.श्री प्रफुल पाटील, किसान सेल जिल्हा अध्यक्ष श्री. पुंडलिक घरत, अल्प संख्यांक जिल्हा अध्यक्ष श्री.आसिफ मेमन, आदिवासी जिल्हा सेल अध्यक्ष श्री.बळवंत गावित, पदाधिकारी रवीश नाचन मनोहर दांडेकर, शैलेश ठाकूर, सलीम पटेल, किरण पाटील, मनोज दांडेकर, मनोहर पाटील,विलास पाटील, रशिक भानुशाली, राजू शुक्ला, नरेश रावते, सुनील हिंगोले, मोईम शेख,इमरान सैयद,कपूर शिपे, व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते सदर आंदोलनात तालुका अध्यक्ष राजेश अधिकारी यांनी आपल्या भाषणात केंद्र शासनाने जर पेट्रोल,डिझेल कमी केले नाहीत तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे सांगितले.
पालघर तालुका काँग्रेस कमिटीचा महागाई विरोधात निदर्शने
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 13, 2021
Rating:
