सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (१४ जुलै) : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येनक जंगलात शिवणी च्या इसमाचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडीस आली. शेषराव गजानन पिंपळसेंडे वय (५०) रा. जुनी शिवणी असे त्या मृतक इसमाचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीन चार वाजताच्या दरम्यान, घरून गेला, परंतु तो परत आला नाही. आज दिनांक १३ जुलै ला १२ वाजताच्या सुमारास येनक च्या जंगल शिवारात गुरे राखणदारांना एक इसम खाली पडून मृत मृतावस्थेत आढळून आला.
सदर घटनेची माहिती येनक येथील पोलीस पाटील यांना मिळाली असता पोलीस पाटलांनी शिरपूर पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली. शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन लुले आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल पोहचून पंचनामा केला असता कोणीतरी मृतकाच्या डोक्यावर तोंडावर दगडाने ठेचून असल्याचे आढळून आले.
मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीम रुग्णालयात पाठवला आला आहे. या प्रकरणी मृतकाचा मुलगा सौरभ शेषराव पिंपळशेंडे याने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भांदवी कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु असून, शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन लुले आरोपीच्या शोधात आहे.
येनक च्या जंगल शिवारात आढळून आला संशयास्पद मृत्यूदेह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 14, 2021
Rating:
