सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
केज, (९ जुलै) : केज तालुक्यातील जोला शिवारात काळवीटाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून देण्याचा प्रयत्न अविनाश ढाकणे, बापुराव ढाकणे, अशोक ढाकणे यांनी केला असून, काळविटला जिवदान मिळाले असून त्याला सुखरुप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
आज शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान, बुरजेशेत नावाच्या शेतामध्ये एका काळविटाला सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. हे बापुराव ढाकणे व अशोक ढाकणे यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी ताबडतोब काळविटाच्या दिशेने धाव घेतली व कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून काळविटाचे प्राण वाचवले.
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून दिली. या संपूर्ण प्रकरणात, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून ते मंडळ स्तरिय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच प्रयत्न करित काळविटाला पुढील उपचारासाठी धारुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात रवाना करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या सर्व प्रक्रियेत 'लेक लाडकी अभियान'चे जिल्हा समन्वयक श्री. बाजीराव ढाकणे यांनी प्रयत्नातून काळविट वन विभागाच्या स्वाधिन करण्याकरिता सहकार्य करण्यात आले. असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी बीड चे जिल्हा वनसंरक्षण अधिकारी तेलंग साहेब, धारुर वनपरिक्षेत्र अधिकारी वरवडे साहेब, सारिका मोराळे, चव्हाण व वनविभागाचे वाहनचालक यांनी प्रयत्न करत आज एका काळवीटाचे प्राण वाचवले.
----------------------------------------
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्मिळ प्राणी व पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जंगली पक्षी व प्राणी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात मानवी वस्ती जवळ येत आहे. यामुळे कुत्रे या प्राण्यांची शिकार करत आहेत. नागरिकांनी प्राणी व पक्षी यांना कुत्र्याच्या व हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून सोडविले पाहिजे.
श्री. बाजीराव ढाकणे
बीड जिल्हा समन्वयक लेक लाडकी अभियान
----------------------------------------
कुत्र्याच्या तावडीतून काळवीटाला दिले जिवदान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
