त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या मारेगाव तालुका समन्वयक पदी कुमारी संगीता नाथाजी भगत यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (९ जुलै) : विकासदुत प्रकल्पाच्या मारेगाव तालुका समन्वयक म्हणून कुमारी संगीता भगत यांची नियुक्ती त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन पुणे च्या संस्थापक अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे तसेच मराठवाडा समन्वयक श्री. दिगंबर वाघ आणि जिल्हा समन्वयक सुषमा शिरभाते यांनी केली आहे.

 विकासदुत प्रकल्प हा समाजातील उपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ गाव, शहर, वस्ती, वाडी, तांड्यावर व अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पार पाडत आहे.

त्रिशरण एलाइनमेंट फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक सुषमा शिरभाते व मारेगाव तालुका समन्वयक कुमारी संगीता भगत यांच्याकडून महफूज अली, हितेश केळकर, संतोष बदकी, सुषमा कोराने, शीतल मालखेडे, प्रफुल शंभरकर, विशाल पेंदोर, महेश पाचपोहर, उज्वला नरांजे व दिनेश कार्लुके यांची विकास दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या मारेगाव तालुका समन्वयक पदी कुमारी संगीता नाथाजी भगत यांची नियुक्ती त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशनच्या मारेगाव तालुका समन्वयक पदी कुमारी संगीता नाथाजी भगत यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.