(संग्रहित फोटो)
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (९ जुलै) : उसने दिलेले पैसे मागितल्यावरून दोन नातेवाईकांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन नातेवाईक इसमाने आपल्याच नातलग महिलेला मारहाण केल्याची घटना ७ जुलैला रात्री १० वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथे घडली. महिलेने झालेल्या मारहाणीची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील खडबडा मोहल्ला येथे राहणाऱ्या कविता कामेश्वर राठोड (३५) यांचा आरोपी अजय शेलार व सोनी अजय शेलार रा. रंगनाथ नगर यांच्याशी उधारीच्या पैशावरून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी कविता कामेश्वर राठोड यांना लाकडी फळीने मारहाण केली. मारहाणीत त्या जख्मी झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कविता राठोड यांनी नातलगांनी केलेल्या मारहाणीची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी आरोपी अजय शेलार व सोनी अजय शेलार यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास जमादार भादेकर करीत आहेत.
उसनवारीच्या पैशावरून महिलेला मारहाण, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
