विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रिया सुरू करा - स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांची मागणी


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (९ जुलै) : येथील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना सरळसेवा भरती प्रक्रियासह विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रिया सुरू करा अशी आज दिलेल्या निवेदनातून मागणी केली.

महाराष्ट्र शासनानाअंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय व निमशासकीय विभागामध्ये भरती गेल्या दोन ते तिन वर्षांपासून राज्य सरकारने पदभरती काढली नसल्याने अनेक पदाच्या रिक्त जागा आहे. अशी माहितीच्या  अधिकारामध्ये ही बाब उघकीस आली असुन, काही तुटपुंज्या जागांवर नौकर भरती घेवून शासना तर्फे नौकर भरतीचा देखावा केल्या जात आहे. असे अभ्यासिकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.
                                       
विद्यार्थी मागील पाच ते सहा वर्षांपासून सतत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. परंतु मागील पाच ते सहा वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासनाने शासकीय विभागातर्फे कुठलीही शासकीय नौकर भरती घेण्यात आली नाही. नुसते नौकर भरती बाबत महाराष्ट्र राज्य शासनाकडून फक्त आश्वासन दिले जाते, परिणामी शासकीय नौकर भरती न झाल्याने अनेक विद्यार्थी नैराश्येच्या गर्तीत गेले आहे. यामुळे अनेक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक तणाव वाढल्याने टोकाचे पाऊस उचलत आहेत. याचेच  एक उदाहरण म्हणजे पुणे येथील स्वप्निल लोणकर असे  कित्येक स्वप्निल लोणकर आज याच नैराश्येतून जात आहेत. 
यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागातर्फे भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी मागणीसाठी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिका च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

यावेळी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील  विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रिया सुरू करा - स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांची मागणी विविध शासकीय विभागातील भरती प्रक्रिया सुरू करा - स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.