महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख,विकासपुरूष मा.आ. सुधीर मुनगंटीवार साहेब यांना यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक!
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (३० जुलै) : मा.आ.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा हे होते. कार्यक्रमाची सूरवात हनुमानजीच्या मूर्तीला हार, फुल दुधाचा अभिषेक करून हनुमानजीच्या मूर्तीचे पूजन, आरती करून हनुमानजी मूर्तीला उपस्थित सर्वांनी साखळ घालून प्राथना केली. 'हे संकट मोचन हनुमानजी' आमचे नेते सुधीर भाऊ यांना महाराष्ट्रातील दिन दुर्बल जनतेचे प्रश्न सोडविताना व सेवा करीत असताना त्यांना यश दे, बळ दे, तसेच त्यांचे आरोग्य निरोगी सुदृढ राहू दे, त्यांना दीर्घ आयुष्य दे, याप्रमाणे सर्वांनी मिळून प्रार्थना केली. या कार्यक्रमाला मा. नितुताई चौधरी माजी बालकल्याण सभापती जी.प चंद्रपूर, मा. शोबाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, मा.विकास जूमनाके उपसभापती पं. स.चंद्रपूर, मा.रणजित सोयाम, जि.प. सदस्य मा.विनोद चौधरी, श्री.अजय चालेकर, सौ.सुरेखा पाटील, सौ.दुर्गा बावणे, सौ.अन्नू ठेंगणे, सौ.माधुरी सागोरे सरपंच, सौ.संगीता हेलवडे, सौ.किरण अलोणे, सौ.किरण डोंगरे सौ.सलमा शेख, सौ.कल्पना घुने, सौ.शर्मा ताई श्री.विनोद खडसे, श्री.भारत रोहणे, श्री.रामू बल्की, श्री.अशोक पटेल, श्री.विजय माशिरकर श्री.आशिष वाडई, श्री.महादेवपिदुरकर,श्री.नानाजी थेरे श्री.प्रमोद जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा चंद्रपूर, श्री.अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू.मो चंद्रपूर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. पवन डोंगरे, श्री.संदीप ठाकरे, श्री.गोविंदा गणफुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख,विकासपुरूष मा.आ. सुधीर मुनगंटीवार साहेब यांना यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2021
Rating:
