रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवक, उमरखेड येथील घटना


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० जुलै) : उमरखेड तालुक्यातील पाटील कॉलनी येथील एका तरुणाला दगडाने ठेचून खून करण्यात आला. घटनेची बातमी कळताच बघ्यानी घेतली पैनगंगा नदीकडे धाव. 

अक्षय वसंतराव करे (अंदाजे वय २०) रा. पाटील कॉलनी उमरखेड येथील रहिवाशी आहे.
सविस्तर असे की, काल दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळ च्या दरम्यान, मित्रांसोबत बाहेर गेले असल्याचे कळतेय, उमरखेड ते हदगांव रोड पैनगंगा नदीलगत अक्षय करे हा मृत अवस्थेत वाटसरुंच्या निदर्शनास आला. त्यावेळी  घटनास्थळी त्याच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने ठेचल्या सारख्या च्या अवस्थेत आढळून येत आले. दरम्यान, उपस्थितीतांकडून ठेचून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती उमरखेड पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी मृतकाची ओळख पटली असून, अक्षय च्या वडीलांना सकाळी ११ वाजता च्या जवळपास मोबाईल संपर्क साधून कळविण्यात आले. दरम्यान,मृत्यूदेहाच्या बाजूला प्लास्टिक ग्लास व दारूच्या बाटला आढळून आल्याने अक्षय चा दारूच्या नशेतून घातपात तर झाला नाही ना? अशी शंका वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पंचनामा करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणी करिता उमरखेड शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला. ठाणेदार वागतकर साहेब यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे.
रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवक, उमरखेड येथील घटना  रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवक, उमरखेड येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.