ग्रामसंवाद सरपंच संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी गठीत



सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० जुलै) : महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद सरपंच संघाची कार्यकारणी (दि.२९) जुलै रोजी बैठक कार्याध्यक्ष बाबाराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शक म्हणून एड. देवा पाचभाई, नवजीवन संस्था मारेगाव मारोती पाचभाई प्रशिक्षक संतोष आस्वले, तर यावेळी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांची प्रदेश कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी सिंधी महागाव उपसरपंच अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली. सचिव पदी देवाडा उपसरपंच सुरेश लांडे, उपाध्यक्ष नरसाळा उपसरपंच यादवराव पांडे, उपाध्यक्ष घोडदरा विनोद आत्राम, उपाध्यक्ष धामणी सरपंच सुरेखा चिकराम, समनव्यक सरपंच सिंधी नीलिमा थेरे, सरचिटणीस सरपंच चिचमंडळ वैशाली परचाके, सरचिटणीस सरपंच चोपन शारदा गोहोकार, सरचिटणीस सरपंच बोरी(गदाजी) प्रवीण नान्हे, सरचिटणीस कोसारा पांडुरंग ननावरे, कोशाध्यक्ष सरपंच मांगरूळ जगदीश ठेंगणे यांची निवड करण्यात आली.
ग्रामसंवाद सरपंच संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी गठीत ग्रामसंवाद सरपंच संघाची मारेगाव तालुका कार्यकारणी गठीत Reviewed by सह्याद्री चौफेर on July 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.