सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (३० जुलै) : तालुक्यातील बामणी (बु.) येथील रहिवासी लक्ष्मण पिराजी बादेवाड (२८) यांचा शेतात काम करत असतांना आज ३० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त, बामणी (बु.) येथील युवक लक्ष्मण पिराजी बादेवाड हा शेतात निंदन, खुरपणी चे काम करत असतांना अचानक पणे हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच देगलूरला उपचारासाठी रुग्णालयात जात असतांना अर्ध्या वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पुतण्या वारला हे बातमी कळताच चुलती शेतात काम करत होत्या त्यांनी लगेच घर गाठले. पुतण्याचे निधन अनावर झाले, घरी आल्यावर जाईबाईच्या गळ्याला पडुन रडत असतांना लक्ष्मीबाई बादेवाड (५५) यांचाही हृदयविकराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा काही क्षणात मृत्यू झाल्याने बादेवाड कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद घटनेत गावातील नागरिक त्यांच्या दु:खात शामिल असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात येत आहे.
पुतण्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधनाची बातमी एकूण चुलतीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2021
Rating:
