दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे, महाराष्ट्रातही कारवाई


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (२२ जुलै) : देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक असलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या देशभरातील विविध कार्यालयांवर आज इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले. इन्कम टॅक्स विभागाच्या या कारवाईत दैनिक भास्कर समूहाच्या महाराष्ट्रातील कारवाईचाही समावेश आहे. दैनिक भास्कर समूह महाराष्ट्रात दैनिक दिव्य मराठी हे दैनिक चालवतो.

प्राप्त माहितीनुसार, इन्कम टॅक्स विभागाच्या पथकांनी दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर छापे टाकले. या कार्यालयांच्या इन्कम टॅक्स विभागाच्या पथकांकडून झाडाझडती घेण्यात येत आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सीबीडीटीने अद्याप या कारवाईबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, मात्र दैनिक भास्कर समूहाच्या विविध कार्यालयांची झाडाझडती सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. करचोरी प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

इन्कम टॅक्स विभागाने ही कारवाई करत असताना दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. कार्यालयातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे, महाराष्ट्रातही कारवाई दैनिक भास्कर समूहाच्या कार्यालयांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे, महाराष्ट्रातही कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on July 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.