नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाला वाचविले ; उमरखेड तालुक्यातील घटना

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (२२ जुलै) : उमरखेड तालुक्यांतील कुपटी येथिल विजय येलुतवाड हा तरुण दहगाव नाल्यात वाहून गेल्याने खळबळ उडाली होती. त्या अनुषंगाने सतहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ शोध मोहीम सुरु करुन पुरात अडकलेल्या तरुणाला स्थानिक पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, नाल्यात वाहून गेलेला तरुण विजय येलुतवाड यांच्याशी संवाद साधताना विजय म्हणाला.. दवाखान्यात जात असताना पुलात अडकडून पडलो पाण्याच्या प्रवाह जास्त  असल्याने एका झाडाचा आश्रय घेतला, हे जेव्हा प्रशासनाला समजले तेव्हा शोध पथक येऊन मला सुखरूप बाहेर काढले असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशासनाकडून आवश्यक अwसल्यास बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये, नदी नाले पाणी वाहत असतांना ओलांडून पार करण्याचा प्रयत्न करू नये. नदी नाले काठावर राहणाऱ्यांनी वेळीच सतर्क राहण्याचे सांगितले.
नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाला वाचविले ; उमरखेड तालुक्यातील घटना नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाला वाचविले ; उमरखेड तालुक्यातील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on July 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.