साई मित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२२ जुलै) : जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. या कठीण काळाचे महत्व लक्षात घेऊन साई मित्र परिवार यांच्या वतीने या वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

'रक्तदान हेच श्रेष्ठदान' हे सर्व लक्षात घेऊन गेल्या ९ वर्षापासून मारेगाव साई मित्र परिवारातर्फे 'गुरुपौर्णिमा उत्सव' साजरा केला जातो. 
त्या निमित्ताने या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन जगन्नाथ महाराज मंदिर (राष्ट्रीय शाळा) येथे करण्यात आले आहे. त्याच सोबत ग्रामीण रुग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाप्रसाद चा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या निमित्ताने शिबिरात मोठ्या संख्येने मारेगाव तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे साई मित्र परिवार यांच्या तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
साई मित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन साई मित्र परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.