टॉप बातम्या

महागांव तालुक्यातील नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा ईशारा


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२२ जुलै) : महागांव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. सतत च्या पावसाने नदी पात्रात दुपार पर्यंत वाढ होत होती, त्यामुळे तहसीलदार इसळकर यांनी सतर्कतेचा इशारा दिला. पण मात्र, आता ते हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु मराठवाड्यातील हदगांव, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, किनवट, या भागात व विदर्भातील उमरखेड,ढानकी या भागात जर पाऊस जास्त झाला तर पैनगंगा नदी कधी ही धोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील वरोडी, कासारबेहळ, थार, कवठा, धनोडा आणि दहीसावळी या गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच धनोडा येथील पुलावरून माहूर कडे जाणारा हा मार्ग कधी बंद होऊ शकतो, वातावरणाचे चे गांभीर्य लक्षात घेत या भागातील स्थानिक तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या असून, तहसील कार्यालयाची गाडी या नदी काठ च्या गावांना भेट देऊन गेली असल्याची माहिती आहे.
त्यामुळे महागांव तहसीलदार इसळकर यांनी नदीकाठ च्या गावांना सतर्क राहण्याचा ईशारा दिला आहे. 
Previous Post Next Post